बंदी गुटख्याची वाहतूक,एकास‌ पकडले | ९.७१ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
149

सांगली : जुना बुधगाव रस्ता परिसरातील नवीन आरटीओ कार्यालयाजवळ चारचाकी वाहनातून गुटखा, सुगंधित पानमसाला याची वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेत कारसह ९.७१ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सचिन हणमंत शेलार (वय ४२, रा. वाल्मिकी आवास योजना, सांगली) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसाचे पथक गुटख्याचा साठा, विक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेत होते.पथकातील संदीप पाटील, संतोष गळवे,गौतम कांबळे यांना जुना बुधगाव रस्ता परिसरातील नवीन आरटीओ कार्यालयाजवळ एका कारमधून (एमएच ०९ डीए ४१८८) एक तरूण काही पोती नेत असल्याचे पथकाला आढळून आले.

त्या कारची ‌तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेला गुटखा आणि सुगंधी पानमसाला आढळून आला. पोलीसांनी कारसह मुद्देमाल जप्त करून संशयित सचिन शेलार याला अटक केली आहे.सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here