जत विधानसभा मतदार संघात भूमिपुत्र की आयात उमेदवार असा उभा संघर्ष जत भाजपात चालू असतानाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारीची घोषणा आज पक्षाकडून करण्यात आली आहे.त्यामुळे जतमध्ये आमदार विक्रमसिंह सावंत विरूध आमदार गोपीचंद पडळकर असा सामना होणार हे निश्चित झाले असून स्थानिक भाजप नेत्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बंडखोरी झालीच तर जतमध्ये तिरंगी लढत होणार आहे.पक्ष नेतृत्वाने जत मधिल नेत्यांचा विरोध डावलून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.आमदार गोपीचंद पडळकर हे मोठ्या फरकाने विजयी होणार असे त्यांचे समर्थक महादेव हिंगमिरे यांनी संकेत टाइम्सशी बोलताना सांगितले.