जत : जत तालुक्यातील सार्वजनिक व सामाजिक राजकीय क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत आहे, मिळालेल्या पदाच्या माध्यमातून संबंधित घटकांना न्याय दिला आहे.मार्केट कमिटीचे त्रिविभाजन रद्द होण्यासाठी ऐतिहासिक लढा, छत्रपती शिवाजी महाराज १०४ गाळ्याचे कॉम्प्लेक्स, जिल्हा बँकेच्या योजनेचा लाभ,वाळेखिंडी येथून किसान रेल्वे सुरू केली.जेणेकरून शेतकरी,कष्टकरी, महिला सामान्य घटकांच्या हितासाठी काम करत आहे.भाजपकडे उमेदवारी मागितली होती.मेरिटमध्ये नाव असतानाही पक्षाने उमदेवारी दिली नाही.उमेदवारी दिली नसली तरीही अपक्ष अर्ज ठेवला आहे. नाराज व नाउमेद न होता जत तालुक्याच्या हितासाठी व स्वाभिमानाला ठेच न लावता तालुक्यातील कार्यकर्त्यांची मते आजमावूनच पुढचा निर्णय घेऊ,असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केले.
घोलेश्वर येथील शिवनेरी अक्वा येथे आयोजित विधानसभा निवडणुकी संदर्भात निवडणूक लढवावी व अन्य निर्णय घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात जमदाडे बोलत होते.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रामाणा जिवान्नावर, वज्रवाड सोसायटीचे चेअरमन चिदानंद चौगुले,माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत,माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी,सरपंच शिवाप्पा तावशी,देखरेख संघाचे माजी अध्यक्ष बापूसो पाटील, मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल निकम,बिळूरचे उपसरपंच बसगोंडा जाबगोंड,डोर्ली सोसायटीचे चेअरमन पिंटू माने,बेवणुरचे दगडू आलदर,अमोघसिद्ध शेंडगे,माजी पंचायत सदस्य सिद्धू माळी , डॉ.साहेबराव गावडे, सरपंच गोपाल कुंभार,उमराणीचे उपसरपंच संजय शिंदे, बनाळीचे उपसरपंच मंगेश सावंत, येळवीचे उपसरपंच विश्वास खिलारे, लिंबाजी सोलनकर,बिळूरचे माजी सरपंच नागनगोडा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जत : तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका मांडताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा अपक्ष उमेदवार प्रकाशराव जमदाडे.