निवडणूक विषयक कामकाज करणारे विभाग, कार्यालये

0
27

आज स्थानिक सुट्टी दिवशी सुरू राहणार

सांगली : ‍जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 17 नोव्हेंबर 2023 च्या आदेशान्वये गुरूवार, दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्दशी साठी स्थानिक सुट्टी जाहीर केलेली आहे. परंतु मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडील  दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजीचे पत्र व सामान्य प्रशासन विभागाकडील दि. 9 नोव्हेंबर 2023 ची अधिसूचना तसेच निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्ट 1881 नुसार ही सुट्टी सार्वजनिक सुट्टी नाही. सद्यस्थितीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम चालू असल्याने दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व निवडणूक विषयक कामकाज करणारे सर्व विभाग व कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here