शिराळा विधानसभा मतदारसंघातून सोमवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १५ पैकी ९ उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक व भाजपचे सत्यजित देशमुख यांच्यात होणार आहे. दरम्यान, भाजपचे नेते सम्राट महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
रिंगणातील उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे : मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष), सत्यजित शिवाजीराव देशमुख (भाजप), गौस मुजावर (बहुजन समाज पार्टी), अनिल अलूगडे (अपक्ष), जितेंद्र शिवाजीराव देशमुख (अपक्ष), मानसिंग ईश्वरा नाईक (अपक्ष).
अर्ज मागे घेतलेले उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे: सम्राट महाडिक (भाजपा), आनंदराव सरनाईक (संभाजी ब्रिगेड), विराज नाईक (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष), तेजस्वी महाडिक (अपक्ष), सम्राट शिंदे (अपक्ष), रवी पाटील (काँग्रेस), निवास पाटील (अपक्ष), तानाजी पाटील (अपक्ष), प्रवीण पाटील (अपक्ष).