जत : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या अनेक उपसा सिंचन योजना १९९९ पासून बंद ठेवण्याचे पाप आघाडीतील नेत्यांनी केल्याचा आरोप करून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दुष्काळी तालुक्यात दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला. जत हा राज्यातील शेवटचा मतदार संघ असला तरी तुम्ही गोपीचंद पडळकर यांना विधानसभेत पाठवा तालुका दुष्काळमुक्त तर करूच शिवाय उद्योग आणून जतला राज्यात नंबर वन करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील भाजपचा प्रचार शुभारंभ तथा जत विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, डॉ. रवींद्र आरळी, ब्रह्मानंद पडळकर दीपक म्हैसाळकर, दौलत नाना शितोळे, सरदार पाटील, सुनील पवार, रिपाइंचे संजय कांबळे आप्पासाहेब नामद, संजय तेली, दिग्विजय चव्हाण, आकाराम शिवाप्पा तावशी विश्वल निकम, चंद्रशेखर गोब्बी, सुशीला व्होनमोरे, तेजस्विनी व्हनमाने, राजेंद्र कोळेकर,अभिजीत चव्हाण, प्रभाकर जाधव, ममता तेली, संगीता लेंगरे, वसुंधरा हिंगमीरे, सलीम गवंडी, संतोष मोटे, राजू यादव, गौतम ऐवळे, प्रवीण अवरागी, मारुती सरगर, रमेश पाटील, विक्रम लाड, सोमनिग बौरामनी, कृष्णा कोळी, पापा कुंभार, आर के पाटील, मिलिंद पाटील, धन्यवाद परशुराम मोरे, अंकुश हुवाळे उपस्थित होते.
जत मतदार संघ राज्यातला शेवटचा मतदार संघ असला तरी आमच्यासाठी हा पहिला मतदार संघ आहे. या मतदारसंघात माझा गोपचंद लढतोय म्हणल्यावर प्रचाराचा शुभारंभ येथून करण्याचे ठरविले असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले दुष्काळी तालुक्याला पाणी दिले तर ऊसतोडीला मजूर मिळणार नाहीत या दृष्टिकोनातून आजवर सत्ता भोगलेल्यानी दुष्काळी तालुक्यांना दुष्काळातच खिचपत ठेवण्याचे काम केले. मी मुख्यमंत्री झाल्यावर राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय घेतला.१९९९ पासून आधाडी सरकारने बंद ठेवलेल्या उपसा सिंचन योजनाना कोट्यवधीचा निधी देऊन पुन्हा सुरू केल्या.म्हैसाळ योजनेसाठी २७२ कोटी तर विस्तारित साठी दोन हजार कोटी दिले.
त्यामुळे जत तालुक्यातील ६४ गावासह तालुका दुष्काळमुक्त होईल. उपसा रित्चन योजनेचे वीजबिल शेतकऱ्यांना भरावे लागू नये यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प योजना आणली. त्याची सुरखातही म्हैसाळ योजनेपासून केली आहे.
फणवीस म्हणाले,शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळावे यासाठी दोन वर्षात १६ हजार कोटीचे प्रकल्प उभे करण्याचे धोरण महायुतीचे आहे. उद्योगासाठी राज्याने ५२ टक्याची गुंतवणूक केली आहे. जत तालुक्याला एमआयडीसी मंजूर केली असून येथे मोठे उद्योग उभे करण्याची जबाबदारी मी घेतो. भाजप पक्षाने समाजातील वंचित घटकांना घेऊन वाटचाल करण्याचे धोरण घेतले आहे. या घटकातील लोकांना आर्थिक स्थैर्य मिळावे म्हणून लिंगायत, रामोशी यासह अन्य समाजाचे आर्थिक महामंडळाची निर्मिती केली.
मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न बधणाऱ्या जिल्ह्यातील एका नेत्याला जतमधून आपल्या मुलाला रिंगणात उतरवायच होत पण बहुजनाच पोरग आल्यानंतर येथून पळ काढला असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशद्याक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता करून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी करत ते म्हणाले, काँग्रेसचे मंडळी गोपचंद बाहेरून आल्याचा आरोप करीत आहेत मग त्यांच्या सोनिया काकू कुठून आल्या हे ही सांगावे अशा मंडळींना गोपीचंद झोपेतही दिसत आहेत.
जिल्ह्यातील काही मंडळींनी साखर कारखाने मोडून खाल्ले, सस्त्यांची वाट लावली जातीपातीत भांडणे लावली पण आता असे होणार नाही बहुजन नेता बहुजनांच्या खांद्याला खांदा लावायला देवेंद्र फडणवीस आलेत. शेतकऱ्यांना कर्ज माफी, मोफत वीज दिली. लाडक्या बहिणीला दरमहा २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी बहुजनांच्या विकासासाठी तिजोरी रिकामी केली आहे. राज्याचे लक्ष जत मतदार संघावर असले तरी येथे बहुजनांचा आमदार होणार असा विश्वास दिला.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अडीच वर्षे जलसंपदा मंत्रीअसताना ५० रुपयेही निधी म्हैसाळ योजनेला दिला नाही असा धनाधात करून गोपचंद पडळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीसच जलचा दुष्काळ हटवू शकतात. त्यांनी म्हैसाळला निधी तर दिलाच शिवाय विस्तारितला २ हजार कोटी दिल्याने राहिलेल्या ६५ गावांना पाणी मिळणार आहे. विलासराव जगताप, विक्रम सावंत माझे शत्रू नसून दुष्काळ, बेरोजगारी, उत्सतोडी या शत्रूना हद्दपार करायचे आहे. सध्याचे आमदारांचे नातेवाईक मंत्री होते त्यांनी जतसाठी काहीही केले नाही. रस्त्यांची अवस्था चांगली नाही.
तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या जतच्या पालिकेला इमारत नाही, पाणी योजना नाही. माझ्या प्रयत्नामुळे शहरासाठी ७८.९४ कोटी मंजूर झाले. उमदीला एमआयडीसी मंजूर करून आणली पण येथे उद्योग कसे येणार असा आरोप होत आहे. मात्र आमचे बैंड देवेंद्र फडणवीस इंटरनॅशनल बैंड आहेत येणाऱ्या काळात ते निश्वितच येथे आंतरराष्ट्रीय कंपन्या आणतील. त्यामुळे जतमध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नसल्याचे
सांगितले. स्वागत डॉ. रवींद्र आरळी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे सरदार पाटील, परशुराम मोरे, नगरसेवक राजू यादव, कलाप्पा पाचंगे, मेहबूब जातगार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केला.
राहुल गांधी यांची भारत जोड़ो अभियान अराजकता माजविणारी आहे. हे अभियान भारत तोडो अभियान असल्याचा आरोप करून देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे. या योजनेसह अनेक जनतेच्या हिताच्या योजने विरोधात काँग्रेसचे नाना पटोले आणि त्यांचे सहकारी कोर्टात मेल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.
दूसरे सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल त्यामुळे कमळालाच मत द्यायचं अस बायकोला सांगायच अस म्हणून सदाभाऊ खोत म्हणाले, तुम्ही गोपचंदला निवडून द्या, मी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात त्यांना मंत्री करा अस हळूच सांगतो अन मलाही मंत्री करा असंही सांगतो अस म्हणताच सभेत हशा पिकला