जत :जत विधानसभा निवडणूक जोर धरत असतानाच आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपातील नाराज गटांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले असून तालुक्यातील अनेक नाराज छोट्या मोठ्या नेत्यासह कार्यकर्त्यांच्या जोडण्या वाढवत प्रचारात आघाडी घेतली आहे.
आमदार विक्रमसिंह सावंत यांनी प्रथम महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे संख व उमदीतील नेत्यांशी संवाद साधत त्यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे.त्याचबरोबर जत व पश्चिम भागातील राष्ट्रवादी कॉग्रेसचा गटाबरोबर जुळवून घेत ताकत वाढविली आहे.त्याचबरोबर भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रकाशराव जमदाडे यांनीही आमदार सावंत यांना पांठिबा दिला आहे.त्याशिवाय अन्य पक्षातील नाराजाची मोठी बांधत विजयाच्या जोडण्या सुरू केल्या आहेत.
अन्य पक्षातील नाराजावर त्यांची टिम लक्ष ठेवून असून त्यांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.तालुक्यातील गावागावात पोहचत आमदार सावंत जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहेत.त्यांना मिळणार प्रतिसाद मोठा विजय मिळवून देईल असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.