‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी’

0
288

विधानसभा निवडणुकीत प्रचार आणि जाहीर सभांचे‌ सत्र सुरू झाले आहे.आता आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच केली आहे.त्यामुळे आता त्यांच्या या घोषणेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते.

या सभेत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सरकार करेल. त्यासोबतच मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दीदी निर्माण करत आहोत.तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असलेले आपले सरकार एक रुपयात 8000 कोटींचा पीक विमा देत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारने दिला आहे.

तुमच्या आशीर्वादाने आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यासोबतच एमएसपीपेक्षा बाजारभाव कमी झाला तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे.त्यामुळे महायुतीला साथ‌ ‌द्या, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here