बाज गावातून इतके लीड देणार आहात की ते कुठेच तुटू शकणार नाही,त्यामुळे निधी देण्याची जबाबदारी माझी आहे,राज्यात कुठेही काम असूदे मी शंभर टक्के करतो,असे एकत्रित रहा,गावाचा विकास करा,असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजमध्ये उद्गार काढले.
बाजमध्ये आ.पडळकर यांच्या सभेत इतिहास घडला.एकमेकांशी टोकाशी संघर्ष,विस्तवही जात नाही इतका तीव्र विरोधक असणारे जिल्हा परिषद सदस्य आकाराम मासाळ,माजी सरपंच संजय गडदे,अरविंद गडदे,आप्पा मासाळ, विद्यमान सरपंच राज गडदे,अँड.नानासो गडदे,सुरेश घागरे हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर आले.
पडळकरांनी तुम्ही गावाच्या विकासाठी असेच एकत्र रहावे,मला सर्वाधिक लीड या गावातून मिळणार आहे.त्यामुळे सर्वाधिक निधी देण्याची जबाबदारीही मला पार पाडावी लागणार आहे.ते मी आज जाहीर करतो म्हणत त्यांनी सभामंडपासाठी १ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचा शंब्द पडळकर यांनी यावेळी दिला.