जत : जत विधानसभा निवडणूक लढवायची नियोजन नव्हतेच,मात्र जतच्या नेत्यांनीच एवढा विरोध केला कि,पक्षाच्या नेत्यांनी जतमधून निवडणूक लढविणार का असे विचारले,मी काम करतोय तुम्ही ठरवा असे सांगितले.जतचे लिंगायत समाजाचे डॉ.रविंद्र आरळी यांनी येथून तुम्ही लढायला लागतयं असे सर्वात प्रथम मला सांगितले.त्यानंतर सर्वच लिंगायत समाजाचे नेते चंद्रशेखर गोब्बी,सुभाष गोब्बी,संजय तेली अशा सर्वच नेत्यांनी माझी भेट घेत निवडणूक लढविण्याची विंनती केली.
डफळापूरचे दिग्विजय चव्हाण यांना विचारले,त्यांनी तिकिट मिळालेतर तुम्हाला निवडून आणण्यासाठी रात्रीचादिवस करू असे सांगितल्यानंतर मी येथून निवडणूक लढविण्याचे ठरविले.मला सहा महिन्याचा कालावधी मिळाला,वर्ष भरापुर्वी ठरले असतेतर तूफान निधी आणला आहे,आताही जास्तीत जास्त निधी मी जतसाठी आणला आहे.विधान परिषदेवर मला मर्यादा पडतात,आटपाडीला पण निधी द्याला लागतोय,विधानसभेवर मला पाठवा जतला पाच वर्षात राज्यात नंबर वन करतो,असे,आश्वासन यावेळी आ.पडळकर यांनी दिले.
आ.पडळकर यांनी जतच्या भाजपा नेत्यांचे आभार मानले,त्यांनी मोठा विरोध केल्यामुळे मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जतमधून निवडणूक लढविण्यासाठी पाठविले.नाहीतरी मी येथून लढणारचं नव्हतो.