मी काम हातात घेतलय,जतला MH58 ब्रँड करणार.. | डफळापूरच्या सभेत आमदार पडळकरांची नवी घोषणा

0
496
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: a; hw-remosaic: 0; touch: (0.2935185, 0.2935185); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 330.31284; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

डफळापूर ‌: एमएच ५८ जतचा‌ ब्रँड करायचा आहे.मी काम हातात घेतलय,जत तालुक्यासाठी स्वतंत्र आरटीओ ऑफिस निर्माण करणार आहोत.त्यामुळे मला विधानसभेवर पाठवा राज्यात आपल ‌सरकार येणार आहे.त्यामुळे विकास निधीची चिंता करू नका,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी डफळापूर येथील जाहिर सभेत केले.

पडळकर म्हणाले,जतचे विद्यमान आमदारांचे नातेवाईक पालकमंत्री असताना जेवढा निधी पलूस-कडेगावला नेहला,तेवढा निधी सुध्दा जतला मिळाला नाही.त्यामुळे मला आमदार करा,जिल्ह्यात सर्वाधिक निधी जत तालुक्यासाठी खेचून आणतो.जत तालुक्यातील सिंचनापासून वचिंत ६५ गावे व ज्या गावात म्हैसाळचे‌ पाणी गेले नाही तेथे एक वर्षात पाणी पोहचवतो.मला मत न टाकणाऱ्या शेतकऱ्यांनाही पाण्याचा चेंबर काढून देणार,प्रत्येकाचा ‌या पाण्यावर हक्क आहे.

हे पैसे कुणाच्या‌ बापजाद्याचे नाहीत,हे तुमचे पैसे आहेत.जत तालुक्याच्या दुष्काळचा कंलक कष्णामाईच्या पाण्याने धुतल्याशिवाय हा गोपीचंद गप्प बसणार नाही.डफळापूरातील कुठल्याही समाजाचे काम सांगा मी ते काम करण्यास बांधिल आहे,मी इतके ‌सांगतोय,हे कसे करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल,पंरतू माझा नेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासावर मी हे बोलतोय,त्यांच्याकडे राज्याच्या विकासाचे‌ व्हिजन आहे.त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, असेही पडळकर म्हणाले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here