शेतीच्या वादातून वकिलाची सख्ख्या भावाने केली हत्या

0
417

शेतजमिनीच्या वादावरून सख्ख्या वकील भावाची कुऱ्हाडाने हत्या करण्यात आली. दुसरबिड नजीकच्या खडकपूर्णा नदीत फेकून दिला. ही घटना शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील नंधाना गावात घडली. आरोपींनी मृतदेह ड्रममध्ये टाकून बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दुसरबीड नजीकच्या खडकपूर्णा नदीत फेकून दिला. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अॅड. रघुनाथ आत्माराम गवळी (36, रा. नंधाना) बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या आईनेमंगळवारी (दि. 5) शिरपूर पोलिसांत दाखल केली होती.

यादरम्यान शुक्रवारी (दि. 8) खडकपूर्णा नदीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. किनगाव (जि. बुलडाणा) पोलिसांच्या तपासात तो नंधाना येथील अॅड. गवळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी मृतक अॅड. गवळी यांचा भाऊ नंदकिशोर आत्माराम गवळी (28) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता अॅड. गवळी यांचे वास्तव्य वाशीमला होते. स्वतःच्याच सख्ख्या भावाने त्यांची हत्या केली, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here