सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील चांदोली वसाहतमधील बंद पडलेल्या अंगणवाडीच्या मागील बाजूस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी दोन दुचाकीसह १ लाख २२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित महेश मारुती सावर्डे (वय ४०, रा. दुधगाव), मिलिंद दादा साजणे (वय ५६, रा. दुधगाव), संजय सुकुमार लांडे (वय ४७, रा. स्फुर्ती चौक, इमानधामणी, ता. मिरज), बाळू बंडू गवळी (३८), राम निवृत्ती गवळी (वय ३६) आणि सुशांत महावीर कुदळे (वय ३०, रा. दुधगाव) यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले. चांदोली वसाहतीमधील अंगणवाडीच्या मागील बाजूस जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार दि. १२ रोजी दुपारी ३:४० च्या सुमारास छापा टाकला.