मणेराजुरीत विदेशी दारूसाठा जप्त

0
29

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे बेकायदा विदेशी दारूचा १८ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल तासगाव पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी रणजीत बबन पवार (वय २४, रा. मणेराजुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक माहिती अशी, रणजीत पवार याने मणेराजुरी येथे विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी आणला होता.

मणेराजुरी ते तासगाव रस्त्यावरील गुरुकृपा स्टील दुकानाच्या आडोशाला तो दारू विक्री करत होता. तासगाव पोलिसांना माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास छापा मारला. यावेळी विदेशी दारूच्या १२१ बाटल्या आणि रोख एक हजार रुपये असा १८ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस कर्मचारी कपिल खाडे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here