ऊसतोड सुरू,मात्र फडातही चर्चा निवडणुकीचीच वातावरण कुणाचे?, कोण येणार सत्तेमध्ये

0
55

विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यातच यंदाच्या गळीत हंगामातील ऊसतोड करण्याचे वेध शेतकऱ्यांना लागलेले आहेत. त्यातच समडोळी यासह मिरज पश्चिम भागातील गावांमध्ये फक्त अन् फक्त विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. थंडीची चाहूल लागलेली आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी-विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. यावेळी बदल होणार, की पूर्वीची स्थिती राहणार? मतदान किती टक्के होणार? यावेळी सत्तांतर होणार, की नवखा उमेदवार विधानसभेत जाणार? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या भडिमारात जनतेचीही मोठी करमणूक होत आहे.

ऊस गळीत हंगामाच्या काळात प्रत्येक ऊस उत्पादकाला आपला ऊस साखर कारखान्यांना पाठविण्याची घाई असते. तथापि याच काळात प्रथम निवडणूक नंतर ऊसतोड अशी भूमिका शेतकरी, शेतमजुरांनी घेतली आहे. निवडणुकीच्या निकालानंतरच या भागातील ऊसतोडीला सर्वाधिक गती मिळण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here