आटपाडी: हितवड (ता. आटपाडी) येथील कार्तिक स्वामी देवस्थानमध्ये दि. १५ ते १६ नोव्हेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दि. १५ रोजी संध्याकाळी ६ वाजता महाभिषेक आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती संपन्न होईल. तसेच सकाळी १० वाजल्यापासून मंदिर देवस्थान समिती आयोजक यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्तिक स्वामी देवस्थान समितीतर्फे केले आहे. दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री ९.५५ पासून कृत्तिका नक्षत्र सुरुवात होते. उत्तर रात्री २.५८ वाजता त्रिपुरारी पौर्णिमा समाप्ती असल्यामुळे या वेळेत मंदिर उघडे राहील.