मिरजेत वंचित बहुजन गौतमी पाटील आघाडीच्या प्रचारासाठी लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचा शनिवारी रोडशो होणार होता. मात्र, या रोडशोला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वंचित आघाडीचे उमेदवार विज्ञान माने व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री मिरज शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ मिरजेत शनिवारी गौतमी पाटील यांचा मिरज शहरातून रोडशोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोला पोलिसांनी बंदोबस्त देणे शक्य नसल्याच्या कारणावरून परवानगी नाकारल्याने वाद निर्माण झाला.
यामुळे नाराज झालेल्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर पक्षपात करीत असल्याचा आरोप करीत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
मात्र, अखेरपर्यंत पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, मात्र पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्याने गौतमीचा रोड शोचा कार्यक्रम रद्द करावा लागला.
कारण बंदोबस्ताचे
मिरजेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा रोड शोस पोलिस प्रशासनाने बंदोबस्त देऊ न शकण्याच्या कारणावरुन परवानगी नाकारली आहे. त्यामुळे वंचितचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. यामुळे गौतमी पाटील हिच्या चाहत्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली.