विवाहित महिलेस तिचे दुसऱ्या व्यक्तीबरोबरच्या प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात – आल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार मे ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय सोमनाथ भुमकर (वय २८, रा. विटा, ता. खानापूर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार पीडितेच्या घरासह कोल्हापूर येथील लॉजवर आणि संशयित भुमकर याच्या घरी वेळोवेळी घडला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला आणि संशयित भुमकर हे एकाच वित्तीय संस्थेमध्ये काम करत होते.त्यातून भुमकर याने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. पीडित महिला ही घरी एकटीच असल्याची संधी साधत देवाचा प्रसाद देण्याचा बहाणा करून गेला होता. तेथे पीडितेशी जवळीक करत शरीर सुखाची मागणी भुमकर याने केली.महिलेने त्याला नकार दिल्यावर तुझे प्रेमसंबंध असलेले फोटो माझ्याजवळ आहेत.ते मी तुझ्या कुटुंबाला दाखवेन, अशी भीती घालत भुमकरने पीडित महिलेला ब्लॅकमेल केले. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
बदनामी करण्याची दिली धमकी
वेळोवेळी आपल्या दुचाकीवरून घेऊन जात अक्षय भुमकर याने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणास सांगितल्यास बदनामी करून पीडितेला तिच्या मुलीपासून वेगळे करण्याची धमकी अक्षय भुमकर याने दिली होती.