डफळापूर : डफळापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना १० हजार रूपयाची आर्थिक मदत देत त्यांना या भागातून सर्वाधिक मदत देऊ,असे आवाहन बळीराजा संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष सागर चव्हाण यांनी केले.
रवीवारी पाटील यांनी आ पडळकर यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या कडून आम्ही निवडणूकीसाठी तुम्हाला १० हजार रूपयाची आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले.
पडळकर यांनी दिग्विजय चव्हाण,अभिजीत चव्हाण यांच्या उपस्थितीत ही मदत स्विकारत त्यांना धन्यवाद दिले.सगळ्यांच्या एवढ्या मोठ्या सहकार्याची परतफेड मी शंभर टक्के करणार हे निश्चित आहे. जनसामान्याचे प्रश्न सुटले पाहिजेत,त्यांना सर्व यंत्रणा आपल्या हक्काच्या मिळाल्या पाहिजेत,त्यासाठी मला एकदा आमदार करा,असे आवाहन आ.पडळकर यांनी केले.