सांगली जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान इस्लामपूरमध्ये,जतची आकडेवारी अजून वाढेना | एकूण किती टक्के झाले मतदान..वाचा

0
638

 

सांगली : पंधराव्या विधानसभेसाठी जिल्ह्यात आज, बुधवार (दि.२०) सकाळपासून मतदार मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. सकाळी ७ वा.पासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघात २ हजार ४८२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.५५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान २२.२६ टक्के इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात झाले आहे.   

जिल्ह्यात ८ मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होत असून सध्या महायुतीच्या माध्यमातून सत्तेवर असलेल्यांविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दंड थोपटले आहेत.महायुतीकडून पालकमंत्री सुरेश खाडे,आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख,माजी खासदार संजय पाटील,सुहास बाबर,आमदार सुधिर ‌गाडगीळ,निशिंकात पाटील,संग्राम देशमुख रिंगणात आहेत. 

तर त्यांच्याविरोधात आमदार जयंत पाटील,विश्वजीत कदम,मानसिंग नाईक,विक्रमसिंह सावंत,स्व.आर आर पाटील यांचे चिरजिंव रोहित पाटील,वैभव पाटील,पृथ्वीराज पाटील,तानाजी सातपुते निवडणूक रिंगणात आहेत. 

तर जतमधून अपक्ष तम्मणगौडा रवीपाटील,खानापूरमधून राजेंद्र देशमुख,सांगलीतून जयश्रीताई पाटील,यासह अनेक अपक्ष देखील आपले नशीब अजमावत आहेत.

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

जत –  १६.५२ टक्के 
खानापूर – १६.२५  टक्के
कवटेमहांकाळ-तासगाव – १८.६७ टक्के
मिरज  – १७.७ टक्के
सांगली – १९.६ टक्के
इस्लामपूर- २२.२६ टक्के
पलूस-कडेगाव – १७.३४ टक्के
शिराळा २०.४९ टक्के

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here