जत तालुक्यात अत्यंत चुरसीने मतदान झाले आहे.यात आमदार गोपीचंद पडळकर व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यात लढत होत असून अपक्ष उमेदवार तम्मणगौडा रवी पाटील यांच्या बंडखोरीमुळे तुल्यबंळ लढत पाह्याला मिळाली.भूमिपुत्र व बाहेरील उमेदवार,जाती-पातीचाही जोरदार प्रचार झाला.मात्र गोपीचंद पडळकर यांनी मी जतचा विकास करू शकतो,मला संधी द्या असे आवाहन केले होते.
तर मी पाच वर्षे तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे,असे सांगत मला पुन्हा संधी द्यावी असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले होते.आज मतमोजणीत पहिल्या,दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत आमदार गोपीचंद पडळकर हेच आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हाकेला जतच्या जनतेनी साथ दिल्याचे दिसत आहे.
तिसरी फेरी
आमदार गोपीचंद पडळकर : १३९२३
आमदार विक्रमसिंह सावंत : १०८८४
तम्मणगौडा रवी पाटील : ४२०९
गोपीचंद पडळकर 3039 आघाडीवर