पेठ येथे विवाहितेची गळफासाने आत्महत्या : तपास सुरू

0
113
Crime danger disgrace scandal shame breaking news newspaper urgent headline background.

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील एकतानगरमध्ये भाडेकरू म्हणून राहिलेल्या मूळच्या बीड येथील २१ वर्षीय महिलेने खोलीतील लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आला.

शिवकन्या शरद वाईकर (वय २१, सध्या रा. एकतानगर पेठ, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ज्या खोलीत आत्महत्या केली तेथेच बाजूला दीड वर्षांचे बाळ टाहो फोडून रडत होते.\

दरम्यान, तिचा पती शरद याने पत्नी मोबाइल फोन उचलत नसल्याने शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्रास त्याच्या यरी जाण्यास सांगितले. त्यावेळी ही आत्महत्येची घटना उघडकीस आली.

येथील गजानन पांडुरंग हावळ यांच्याकडे खोली भाड्याने घेऊन पती आणि दीड वर्षाच्या मुलासह हे वाइईकर कुटुंब राहिल्या होत्या. पती शरद हा ट्रक चालक असून तो गुजरातला गेला होता.विवाहितेने गळफासाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दीड वर्षांच्या बाळाला शेजारी राहणाऱ्या शरद वाईकर यांच्या मित्राकडे सोपवले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

दुसरे सत्र सुरू होऊनही गणवेशाचा पत्ता नाही अभूतपूर्व गोंधळ : प्रशासनाला गांभीर्यच नाही

सांगली : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वितरणातील हलगर्जीपणाची चौकशी करावी, दोषींवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन दिले.

शिंदे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना दोनपैकी एकच गणवेश आतापर्यंत मिळाला आहे. शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी अनेक विद्यार्थ्यांना एकाच गणवेशावर शाळेत यावे लागत आहे. दुसऱ्या गणवेशाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सातत्याने विचारणा होत आहे. कापड येऊनही गणवेश वितरणात सावळा गोंधळ सुरू आहे. याची चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी.

दरम्यान, शिंदे यांनी मागणी केली की, गेल्या वर्षी शालेय क्रीडा स्पर्धा उशिरा झाल्याने रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांना खेळावे लागले. त्यामुळे यावर्षी स्पर्धा डिसेंबर ते जानेवारी दरम्यान घ्याव्यात आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांच्या वेतनातून पूर्वीच्या जिल्ह्यात कपात केलेली रक्कम खात्यावर तातडीने जमा करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अनेक शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली होती. राज्य शासनाने निवडणुकीची सततची कामे अशैक्षणिक ठरवली आहेत. ती शिक्षकांना बंधनकारक नाहीत. त्यामुळे त्यांना बीएलओ कामातून मुक्त करावे, अन्यथा कामावर बहिष्कार टाकू.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here