सोन्याचा भाव ५२०० ने घटला,लग्न सोहळ्यांसाठी दागिने खरेदीचा उत्साह

0
943

सांगली : एकीकडे लग्नसराईची लगबग सुरू असतानाच सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या पालकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीत ८१ हजारांवर गेलेला सोन्याचा भाव आठ दिवसांत ७६ हजारपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सोने दरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीचा परिणाम होत असतो. २०२३च्या दिवाळीत सोन्याचा भाव ६० हजार रुपये इतका होता. तो या दिवाळीत ८२ हजारांवर पोहोचला. केवळ एक वर्षात २२ हजार रुपयांनी भाव वाढला. युक्रेन-रशिया युद्ध, गाझापट्टीवर झालेले हल्ले, अमेरिकेतील निवडणूक या सगळ्या गोष्टींचा परिणाम दरवाढीवर झाला होता. आता हा भाव ७६ हजारपर्यंत खाली घसरला. ऐन लग्नसराईमध्ये दर उतरल्यामुळे सांगलीच्या बाजारपेठेत दागिने खरेदीचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here