गौऱ्यापाडा येथील संजय नानसिंग पावरा (२३) याने पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून संतापाच्या भरात स्वतःच्या दोन चिमुकल्यांना कुन्हाडीने वार करून ठार केले; तर पत्नी भारती संजय पावरा ही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मध्य प्रदेशात शनिवारी घडली.
गौऱ्यापाडा येथे संजय नानसिंग पावरा व भारती (१९) हे दाम्पत्य पाच वर्षांचा मुलगा डेव्हिड आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल यांच्यासह राहत होते. आरोपीचे पत्नीसोबत १८ नोव्हेंबरला जोरदार भांडण झाले. त्यामुळे भारती ही मुलीसह मध्यप्रदेशच्या सीमेवरील तिच्या आत्याच्या गावी रांजणगाव येथे निघून गेली. संजयच्या आई-वडिलांनी तेथे जाऊन भांडण केले. त्यानंतर नातेवाईक तिला माहेरी देवली येथे घेऊन गेले. त्यानंतर पती मुलाला घेऊन देवलीत दाखल झाला. यावेळी पत्नीसोबत झालेल्या भांडणात त्याने कुन्हाडीचे वार करून दोन्ही मुलांना जागीच ठार केले.