जत : महाराष्ट्रसह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली आहे.प्रतिवर्षांप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व त्यांच्या जेवणाची सोय संख येथील बाबा आश्रम येथे करण्यात आली .
चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री क्षेत्र संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. मागील दोन दिवसापासून हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला.
जतची श्री यलम्मा देवी व गुडडापुरची श्री दानम्मा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. पाच ते आठ लाख भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येतात. सध्या श्री. दानम्मा देवीची यात्रा सुरू आहे. देवीच्या या कार्तिकी यात्रेला पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. देवींच्या या भाविकांची सोय व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी बाबा आश्रममध्ये त्यांच्या राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची, नाष्टयाची सोय तसेच जेवणाची सोय केली जाते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची सेवा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. पायी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहेत. मागील दोन दिवसांपासून अन्नदान सुरू आहे.
दानात सर्वश्रेष्ठ दान अन्नदान आहे. अन्नदान केल्याने मनाला जे समाधान मिळते ते कोटी रुपये खर्च करूनही मिळत नाहीत. भुकेल्याला अन्न, तहानलेल्यांना पाणी द्या हीच शिकवण राष्ट्रीय श्री संत गाडगेबाबा, वैराग्य संपन्न श्री संत बागडेबाबा यांनी दिली. त्याचेच आचरण आम्ही करत आहोत. चिक्कलगी भुयार येथे दररोज अन्नदान केले जाते. श्री दानम्मा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांसाठीही दोन दिवसापासून चहा, पाण्याच्या बाटल्या, नास्टा व जेवणाची व्यवस्था केली आहे. यात्रा संपेपर्यत हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी सांगितले. यावेळी चनप्पा आवटी, बसू बिराजदार, समर्थ राठोड, कुंडलिक खोत, पिंटू मोरे आदी उपस्थित होते.
■ २०१२ पासून अभिनव उपक्रम
संख येथील बाबा आश्रमात २०१२ पासून हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. दुष्काळ, कोरोनासारख्या कठीण काळातही बाबांनी समाजसेवेचे हे व्रत कायम ठेवले होते. जतच्या श्री यलम्मा यात्रा असो की गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीची यात्रा असो भाविकांना टँकरने पाणी पुरवठा केला होता.