मिरज : मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रविंद्र वस्त्रनिकेतनतर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबविण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत आज दिनांक ४ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे.लकी ड्रॉ मधील विजेत्यांना दुचाकी, एलसीडी टीव्ही, मिक्सर, कुकर यासह विविध भेटवस्तू मिळणार आहेत. या भव्य लकी ड्रॉ सोडत सोहळ्यात कोण होणार बक्षिसांचा मानकरी, याबाबत ग्राहक वर्गामध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
रविंद्र वस्त्र निकेतनने सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातही नावलौकिक मिळविला आहे. या परिसरातील ग्राहकांची वस्त्र खरेदीसाठी रविंद्र वस्त्रनिकेतनाला प्रथम पसंती मिळत आहे.सलगरे येथील रविंद्र वस्त्रनिकेतनच्या मुख्य शाखेसह सर्वच मिनी स्टोअर्समध्ये दिवाळी बरोबरच वर्षभर ग्राहकांची मोठी गर्दी असते. ग्राहकांचे आणि रविंद्र वस्त्र निकेतनचे विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
यामुळेच रवींद्र वस्त्र निकेतनाने त्यांच्या ग्राहकांसाठी भव्य अशी लकी ड्रॉ बक्षीस योजना जाहीर केली होती. दिवाळीच्या दरम्यान रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये वस्त्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कूपनचे वाटप करण्यात आले आहे. या लकी ड्रॉ योजनेची आज दिनांक ४ डिसेंबर रोजी सलगरेतील मुख्य शाखेत सोडत होणार आहे. या भव्य लकी ड्रॉ सोडत सोहळ्याचे लाईव्ह प्रसारणही रवींद्र वस्त्र निकेतन व सांगली अपडेट न्यूजतर्फे सोशल मीडियावरून करण्यात येणार आहे. लकी ड्रॉ योजनेतील भाग्यवान विजेता ग्राहक कोण ठरणार,कुणाला दुचाकी मिळणार, कुणाला टीव्ही मिळणार,याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.