नुतन आमदारांचा महावितरणला दणका,चोवीस तासात बसविला ट्रान्सफॉर्मर

0
985

जत : येळवी खरात वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर रविवारी दुपारी जळाला होता. याबाबत शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना एसएमएसद्वारे माहिती दिली होती. आ. पडळकर यांनी तातडीने महावितरणला सूचना दिल्याने सोमवारी दुपारी ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यात आला. याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

असाच प्रत्यय बनाळी येथील कोळी वस्ती, जाडरबोबलाद येथील डेपोटी सरपंच वस्ती, येळवी येथील रुपनुर वस्ती, रेवनाळ, उटगी, अंतराळ (बुरूटे वस्ती) या परिसरातील शेतकऱ्यांना आला. आमदार पडळकर यांच्या आदेशाने वेळेत ट्रान्सफॉर्मर बसवून मिळत आहेत. गत आठवड्यात प्रतापूर येथील कमते, कोपनूर वस्तीवरील नवीन ट्रान्सफॉर्मर पडळकर यांच्या पाठपुराव्याने बसविण्यात आला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here