जत : गतनिवडणुकीत जतकरांनी दिलेला कौल मान्य आहे.परक्या उमेदवारास जनतेने पसंती दिली याची खंत वाटत असली तरी प्रामाणिकपणे पाठीशी राहिलेल्यांची संख्या ही खूप मोठी आहे याचा गर्व आहे. गेले दीड ते दोन दशके सदैव जनसेवाला अग्रक्रम दिला,असे प्रतिपादन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले.
जत तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत स्नेह संवाद मेळावा जत येथील बालाजी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
ते म्हणाले,आमदार म्हणून कार्यरत असताना २५० हुन अधिक प्रश्न विधिमंडळात मांडले. सत्ता असो किंवा नसो दुष्काळ, पाणी, पीकविमा, रोजगार यासह विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेटाने लढा दिला. सर्वसामान्य जतकरांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे, आंदोलने करत न्याय मिळवून देण्यास आग्रही भूमिका घेतली आणि पुढेही घेत राहील याची ग्वाही देतो. गतनिवडणुकीतील पराभव हा जिव्हारी लागणारा आहे त्यापेक्षा बरेच काही शिकवणारा आहे.
सावंत म्हणाले,भूमिपुत्राऐवजी परक्या उमेदवाराला जनतेने निवडले यामुळे विकासकामांना खीळ बसेल ही शंका आहे मात्र विकासकामांना बाधा आल्यास प्रसंगी जाब विचारणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार असा शब्द या निमित्तानं मी देतो. आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या पाठीमागे आपण सर्वजण पूर्ण ताकतीने उभे राहायचं आहे.
हुकुमशहाच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाही मेली असं सर्वत्र चित्र असलं तरी आपण सर्वांनी पुन्हा एकदिलाने एकत्र यायचं आहे. लोकशाहीला पुन्हा बळकट करायचे आहे. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही ! काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा मिळवल्याशिवाय माघार घ्यायची नाही.यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग,बसवराज बिराजदार,आप्पाराया बिराजदार,महादेव पाटील,बाबासाहेब माळी
जत येथील स्नेह संवाद मेळाव्यात बोलताना विक्रमसिंह सावंत व उपस्थित पदाधिकारी..