जत तालुक्यातून पन्नास हजार ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

0
161

जत : दुष्काळी परिस्थितीमुळे उदरनिर्वाहचे साधन म्हणून जत तालुक्यातील यावर्षी पन्नास हजार ऊसतोड मजुरांनी स्थलांतर केले आहे. २० एकर शेती असलेला शेतकरी ऊसतोड मजूर म्हणून कामाला जातो. ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील बागायती क्षेत्र कमी आहे. दिवसेंदिवस दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याने आष्टा, भिलवडी, सांगली, वाळवा, कर्नाटक राज्य या ठिकाणी अनेक कुटुंबांनी स्थलांतर केलेले आहे. याकरिता पर्यायी व्यवस्था म्हणजे तालुक्यातील शेत शिवारात म्हैसाळचे पाणी फिरल्यावर स्थलांतर कमी

होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. जत तालुक्यात मजुरांच्या हाताला कामाकरिता एकही मोठा उद्योग नाही. तरुण बेरोजगारांची संख्यादेखील जास्त आहे. जत साखर कारखाना राजकीय स्पर्धेत बंद पडल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकासह मजूर, सभासद यांचे नुकसान मोठे झालेले आहे. ऊसतोड कामगार आपले बिन्हाड पाठीवर घेऊन वर्षातील सहा महिन्यांपेक्षा जास्त भटकंती करत असतो. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता उसाच्या फडात राबतो. त्याच्या कामातून साखर गोड होते खरी. मात्र, या ऊसतोड कामगारांचा संघर्ष कायम चालू आहे. सरकार मात्र ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी अपघातात, विषारी साप चावून, विहिरीत पडून मृत्यू होण्याची संख्याही वाढतच आहे. ऊसतोड कामगार दुर्लक्षित

ऊसतोड मजूर शासनाच्या अनेक सोयी-सुविधेपासून वंचित राहिला आहे. अनेक संकटाचा सामना करीत जीवन मार्गक्रमण करतात. ऊसतोड कामगारांची कोणतेही संघटना नाही. याउलट उसाला दरवर्षी दर वाढवून दिला जातो; परंतु ऊसतोड मजुरांना मजुरी वाढविली जात नाही. ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा हवेतच विरली आहे. या महामंडळात आरोग्य विमा, आरोग्य सेवा, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शाळेची व्यवस्था इ. बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

उसाचा कोयता कायमचा हद्दपार करायचा आहे.आमचा एक नंबरचा शत्रू हा दुष्काळ आहे त्याला हद्दपार करायचा आहे. त्याचबरोबर आमचा दुसरा शत्रू माता-भगिनींच्या हातातला उसाचा कोयता आहे आणि तो आम्हाला हद्दपार करायचा आहे, यासाठी मला जतच्या जनतेंनी निवडून दिले आहे. ऊसतोड मजुरांची संख्या कमी करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेच्या जत तालुक्यातील कामांना गती देणार आहे.

– गोपीचंद पडळकर,आमदार

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here