नागरिकांची गैरसोय : जागेच्या मागणीवर स्टँप विक्रेते ठाम
जत : जत येथील नविन प्रशासकिय ईमारत बांधकाम करण्यापुर्वी पूर्वीच्या संस्थानकालीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होते. यावेळी येथील स्टॅम्प व्हेंडर हे त्यांच्यासाठी शासनाने लिखीत स्वरूपात कब्जेपट्टी असलेल्या व सार्वजनिक बांधकाम विभागाने मुद्रांक विक्रेत्यांना बसण्यासाठी बांधून दिलेल्या पत्राशेडमध्ये स्व:ताच्या ख:र्चाने बांधलेल्या शेडमध्ये मुद्रांक विक्री व दस्तऐवज तयार करण्याचा व्यवसाय करित होते.
परंतु नविन प्रशासकिय ईमारत बांधकाम करताना सबंधिताकडून मुद्रांक विक्रेत्यांसाठी बांधण्यात आलेले पत्रा शेड पाडून टाकले.व मुद्रांक विक्रेत्यांनी बसविलेल्या लोखंडी शटरची व फर्निचर ची विल्हेवाट लावून त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे.
येथील मुद्रांक विक्रेते हे त्यांना नविन प्रशासकिय ईमारत परिसरात जागा उपलब्ध होऊन आपला मुद्रांक विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असतानाही प्रशासनाने मुद्रांक विक्रेते यांच्या जागेच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच सद्याची ही परिस्थिती मुद्रांक विक्रेत्यांवर ओढवली आहे.त्यामुळेच त्यांनी हक्काच्या जागेसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले असुन जोपर्यंत प्रशासन मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांक विक्रीसाठी जागा दिलेचे लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत स्टॅम्प विक्री बंदच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.
या संदर्भात आज मंगळवारी येथील उपविभागीय अधिकारीसाहेब अजयकुमार नष्टे,तहसिलदार प्रविण धानोरकर व दुय्यम निबंधक राहुल हंगे यांची बैठक होऊन मुद्रांक विक्रेत्यांना जागा देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे.असे असलेतरी मुद्रांक विक्रेत्यांनी मात्र प्रशासनाने आम्हाला आमच्या जागेची पूर्वीप्रमाणेच कब्जेपट्टी करून जागा त्यांच्या ताब्यात द्यावी व जागेचे बांधकाम करून द्यावे अशी भूमिका घेतली आहे.दरम्यान गेली दोन दिवस येथील मुद्रांक विक्री बंद राहील्याने पक्षकारांची मोठी गैरसोय झाली.