तरुणाने गळफास घेऊन संपवलं जीवन

0
402

सोलापूर : शहरातील एका लॉजमध्ये मुक्कामास असलेल्या परप्रांतीय तरुणाने रुममध्ये टावेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.सरफराज आलम शेख (वय २६, रा. शेरपूर सोंधा किशनगंज, राज्य बिहार) असे या तरुणाचे नाव आहे. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.सदरचा प्रकार आत्महत्या की अन्य कोणते कारण असावे, या दृष्टीने सदर बझार पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण शिवानंद लॉजमध्ये रूम नंबर ११ मध्ये मुक्कामास होता. सकाळी तो रूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत निदर्शनास आला. तातडीने हॉटेलमधील लोकांनी पोलिसांना खबर दिली.रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्धावस्थेत सदर तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, सदर तरुण बिहार राज्यातून चार दिवसांपूर्वी सोलापुरात रस्त्याच्या कामासाठी मजुर म्हणून आला होता. तो लॉजमध्ये मुक्कामी असल्याचे असे सांगण्यात येत आहे; मात्र त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here