जत : संख-लवंगा रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलीसानी अटक केली. तर दोघेजण पळून गेले.जत तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हि कारवाई केली.संशयिताकडून बुलेट दुचाकीसह पिस्तूल, एक काडतूस असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सांगितले.अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक शिंदे यांनी दिल्या आहेत.त्या अनुषंगाने सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथकाने हि कारवाई केली.
सुनील तानाजी लोखंडे (वय २६, रा. लवंगा, ता.जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सचिन बिराजदार (रा.लवंगा), पवन शेंडगे (रा. करेवाडी) अशी पळून गेलेल्या संशयितांची नावे आहेत.सा.पोलीस निरिक्षक पंकज पवार याचे पथक जत तालुक्यात गस्त घालत असताना संख-लवंगा रस्त्यावर तीन तरूण बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली.पथकाने बुलेटवरून संशयित आल्यानंतर त्यांना थांबण्याचा इशारा केला.त्यावेळी बिराजदार आणि शेंडगे पळून गेले.
तर लोखंडे याला पकडण्यात आले.त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक पिस्तूल, काडतूस सापडले. त्याला अटक करून बुलेटसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताला उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने हि कारवाई केली.