पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात,जत तालुक्यातील ६ जणांचा दुर्देवी मृत्यू

0
1739

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघाताची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. ख्रिसमसनिमित्त जत येथील आपल्या गावी येणाऱ्या इगाप्पागोळ कुटुंबाच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची ही घटना मन सुन्न करणारी आहे.

घटनेत प्राण गमावलेल्या चंद्रम इगाप्पागोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. या दुःखद प्रसंगात मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन, महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात.

अधिक माहिती अशी की,पुणे- बेंगळूर महामहामार्गावर हा भिषण अपघात झाला.यात कंटेनर थेट चारचाकी कारवर कोसळल्याने कारचा चेंदामेंदा झाला.सर्वजण दबले गेले.

कारवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील एकाच कुटुंबातील सहा जणांचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना बेंगलोर -तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ (जि.तुमकूर) येथे आज, शनिवारी (दि.२१) सकाळी घडली. 

अपघातात चंद्राम इरगोंडा येगापगोळ (वय ४६) पत्नी गौरम्मा चंद्राम येगापगोळ (४०) मुलगा ज्ञान (१६) मुलगी दिक्षा (१२) विजयलक्ष्मी मल्लिनाथ येगापगोळ -टकळकी (३५) आर्या मल्लिनाथ येगापगोळ-टकळकी (६) यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने मरबगी गावावर शोककळा पसरली आहे.

मोरबगी (ता. जत) येथील मुळ रहिवाशी असलेले व सद्या कर्नाटकातील बेंगलोर येथे स्थायिक झालेले चंद्राम येगापगोळ हे उद्योजक होते. त्यांची स्वतःची बेंगलोर येथे एचएसआरएलऔट परिसरात आएएसटी साँप्टवेअर कंपनी आहे. तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत. आई-वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या कार वाहन क्र. (के. ए. ०१ एन डी १५३६) मोरबगी गावी येत होते. कुटुंबीयांसोबत दोन महिन्यांनी ते गावी येत होते. आजही ते कुटुंबीयांसोबत आई वडिलांना व नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले. चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन महिन्यापुर्वीच दीड कोटींची नवी कार खरीदी केली होती.

बेंगळुरु-तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ कार आली असताना तुमकूरहून बेंगळुरुला निघालेला कंटनेर दुसऱ्या कारला साईट देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कंटनेर डिव्हायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरुन येणाऱ्या चंद्राम इरगोंडा येगापगोळ यांच्या कारवर कोसळला. यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवून मृतदेह बाहेर काढले. 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here