जत : सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यावतीने जत येथील श्री.यल्लमादेवी यात्रेत कृषी प्रदर्शन व खिलार जनावरांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये विविध कृषीपुरक स्टाॅल्स लावण्यात येणार असून या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी व यात्रेकरूंनी भेट द्यावी असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती श्री.सुजय शिंदे यानी माध्यमांशी बोलताना केले.
श्री.सुजय शिंदे म्हणाले जत येथील श्री.यल्लमादेवी ही श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान आहे.नवसाला पावणारी व जागृत असलेली देवी म्हणून या देवीकडे पाहीले जाते.गुरुवार दि.२६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधित ही यात्रा भरत असून ३० डिसेंबर आमवश्येलाही यात्रा भरते.
श्री.यल्लमादेवीची यात्रा ही खिलार पशुसांठी प्रसिद्ध असून या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेश या राज्यातील व्यापारी जनावरांच्या खरेदीसाठी या यात्रेत येतात.जनावरांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते.जनावरांचा बाजार व कृषीप्रदर्शन जत बिळूर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरविण्यात येतो.जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यामार्फतच करण्यात येते.मार्केट कमीटीने ठिकठिकाणी जागोजागी पाण्यासाठी बनविण्यात आलेल्या लोखंडी हौदात पाणी सोडून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.तसेच श्री.यल्लमादेवीचे भाविक भक्तांना चांगल्याप्रकारे रांगेने दर्शन घेता यावे यासाठी सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यामार्फत दर्शन रांगेसाठी संपूर्ण बॅरेकेटींग लावून दिले आहे.
त्यामुळेच भाविकांना देवीचे चांगल्या प्रकारे दर्शन होते.यात्रा कालावधित जनावरांच्या आरोग्याची ही काळजी बाजारसमितीच्यावतीने घेण्यात येत असून यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे फिरते पथक तयार असते.सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्या वतीने यात्रा कालावधित खिलार जनावरांचे भव्य असे प्रदर्शन भरविण्यात येते.या प्रदर्शनात मोठ्या संख्येने पशुपालक आपली जनावरे घेऊन सहभागी होतात.यामध्ये नंबर आलेल्या जनावरांच्या मालकांना अकर्षक अशी बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते दिली जातात.
१९८७ पासून प्रदर्शन अविरत सुरू
सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती स्व.बी.आर.शिंदे व सहकार क्षेत्रातील तत्कालीन सहकार तज्ञ स्व.एन.एस.पाटील यांनी सन १९८७ साली पहिल्यांदाच समान विचारसरनीतून श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत व श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार जत यांच्यामार्फत यात्रेत जनावरांच्या खरेदी-विक्री व पशुप्रदर्शनाची सुरूवात करण्यात आली आहे ती अद्यापही सुरू आहे.