जत : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.यल्लमादेवीच्या यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून आकाशी पाळण्याबरोबरच विविध करमणूकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यवसाईक यात्रेत दाखल झाले आहेत.खिलार जातीची जनावरे ही यात्रेचे प्रमुख आकर्षण बनले आहे.जत नगरिची ग्रामदेवता,महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामीळनाडू,गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री.यल्लमादेवीची यात्रेला आज मंगळवार पासूनच सुरूवात झाली आहे.
खरे पाहीले तर गुरूवार दि.२६ डिसेंबर ते सोमवार दि.३० डिसेंबर अखेरपर्यंत या यात्रेचे प्रमुख दिवस असताना दोन दिवस अगोदरच ही यात्रा भरली आहे.आजपासूनच श्री.यल्लमादेवीचे भक्त यात्रास्थळावर येऊन श्री.यल्लमादेवीचे दर्शन घेऊन तसेच देवीचा नवस फेडून परत जाताना दिसत आहेत.गुरुवार दि.२६ रोजी देवीच्या गंधोटगीचा दिवस आहे.शुक्रवार दि.२७ रोजी देवीला पुरणपोळीचा महानैवैध्य दाखविण्याचा दिवस असून, शनिवार दि.२८ रोजी देवीच्या पालखीची नगरप्रदक्षीणा व किचाचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद राहणार असून तो सोमवारी अमावस्येला उघडला जाणार आहे.
असे या यात्रेचे स्वरूप आहे.खिलार जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध असून मोठ्याप्रमाणात या यात्रेत खिलार जनावरे दाखल झाली आहेत.ज्या जागेवर जनावरांचा बाजार भरविण्यात आला आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फतच या जनावरांच्या बाजाराचे नियोजन करण्यात येते.बाजार समितीच्या वतीने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.तसेच यात्रास्थळावर कृषीप्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे.
जतच्या श्रीमंत डफळे राजघराण्याचे श्री.यल्लमादेवी हे खासगी देवस्थान आहे.सौंदत्ती यल्लमा,कोकटनूर, जत अशी देवीची मोठी महती आहे.जतच्या श्रीमंत डफळेनी देवीवर असलेल्या श्रद्धा व भक्तीपोटी सौंदत्ती येथील श्री.यल्लमा देवीला प्रसन्न करून जतला घेऊन आलेची अख्यायीका आहे.या यात्रेला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामीळनाडू,गोवा या राज्यातून लाखो भाविक येतात. खिलार जनावरांची यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे.
जतमधिल यल्लम्मादेवी यात्रेत पाळण्यासह विविध प्रकारचे साहित्य सज्ज करण्यात आले आहे.जनावरे प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल झाली आहेत.