जत : लाखो लोकांच्या नवसाला पावणारी श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त नूतन आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी तीन दिवस मोफत अन्नदानाचे आयोजन केले आहे. या अन्नदान कार्याचे उद्घाटन भाविकांच्या हस्ते करण्यात आले.
या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात,तसेच जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो.तीन दिवस चालणारी ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते.
या यात्रेत भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी पडळकर बंधूंनी तीन दिवस मोफत अन्नदानाचे आयोजन केले आहे.साईकृपा वस्त्र निकेतन व हॉटेल धनगरवाडा अथणी रोड समोर हे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.