पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आरोपी मोहिनी वाघ हिला न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहिनी वाघ हिला 30 डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी आरोपी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्याकडून गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरु होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. शिवाय सरकारी वकिलांनीही अशाच पद्धतीने युक्तीवाद केली आहे.