सिद्धार्थ पब्लिक स्कूलमध्ये सिध्दार्थ क्रीडा महोत्सव उत्साहात

0
114

जत : सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी शिक्षण संस्थेचे अध्यक्षा डॉ.वैशाली कैलास सनमडीकर संस्थेच्या सचिव डॉ.कैलास उमाजीराव सनमडीकर व उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत चे अध्यक्ष श्री भारत साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत येथे सोमवार दिनांक 24 डिसेंबरला सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये सिद्धार्थ क्रीडा महोत्सव अतिशय अनंदामध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्षा डॉक्टर वैशालीताई सनमडीकर व संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर हे उपस्थित होते.कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये प्रामुख्याने खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, धावणे ,रीले धावणे, तसेच क्रिकेट यासारख्या सांघिक खेळाचा तसेच वैयक्तिक वेगवेगळ्या खेळांचा समावेश होता.आजच्या या महोत्सवाची सुरुवात *रेड, ब्ल्यू, येलो व ग्रीन या चारीही हाऊसने परेड करून पाहुण्यांना मानवंदना दिली व क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून महोत्सवाची सुरुवात झाली.

यामध्ये मुलींचा रस्सीखेच हा सामना अतिशय चुरशीने पार पडला तसेच रिले धावणे हा सुद्धा खेळ अतिशय चुरशीने पार पडला तसेच मुलींचा क्रिकेट सामना अतिशय रंजक पद्धतीने पार पडला आजच्या आजच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवांमध्ये पालकांचा सुद्धा समावेश होता.पालकांचा धावणे व संगीत खुर्ची हे दोन खेळ अतिशय चुरशीने पार पडले. तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा धावणे व क्रिकेट सामना आनंदामध्ये पार पडला.आजच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक सिद्धार्थ ब्ल्यू जर्सी युनिफॉर्ममुळे मैदानामध्ये एकीचे दर्शन घडवत होते,तसेच विद्यार्थ्यांच्या समोर एकीचे बळ काय असते हे सुद्धा दिसून येत होते त्यामुळे *आजच्या या महोत्सवाच्या आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे पालकांच्या खेळ व  शिक्षकांच्या सिद्धार्थ ब्लू जर्सी हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वैशालीताई सनमडीकर यांनी मार्गदर्शन करत असताना खेळामध्ये मुलींचा सहभाग चाचणी खूप गरजेचे आहे असे सांगून मुलींना खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या.

तसेच संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर यांनी मुलांना मार्गदर्शन करत असताना जीवनामध्ये खेळ का आवश्यक आहे तसेच खेळाचे महत्व पटवून दिले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मुलांना खेळामध्ये हार-जीत ही पचवता आली पाहिजे.ज्या पद्धतीने आपण विजयी झाल्यानंतर आनंद व्यक्त करतो त्याच पद्धतीने मोठ्या मनाने आपण हार सुद्धा पचवता आली पाहिजे.या मैदानी खेळातून आपल्याला मानसिक दृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मदत होते. मुलांनी शालेय जीवनामध्ये कमीत कमी दररोजच्या जीवनामध्ये 25 ते 30 मिनिटे आपला वेळ हा मैदानामध्ये घालवला पाहिजे.त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीने तंदुरुस्ती करता येते. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते असे त्यांनी सांगितले. 

प्रशालेचे प्राचार्य के श्याम सुंदर सर व क्रिडा विभागाचे प्रमुख शाहू कांबळे सर व सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व बसचालक व मावशी यांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here