जत : उद गं आई उदं,यल्लू आईचा उदं च्या जयघोषात लाखो भाविक भक्तांनी घेतले देवीचे दर्शन दे तले.पालखी नगरप्रदक्षिणा व किचानंतर यात्रेची सांगता जाली.पुढील यात्रा दि.१५ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२५ मध्ये भरणार आहे.जत येथील श्री.यल्लमादेवीची यात्रा भरगच्च भरली आहे.यात्रेत करमणूकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यवसाईक आले आहेत.आज शनिवार श्री.यल्लमादेवीच्या यात्रेतील किचाचा दिवस व पालखी नगरप्रदक्षिणा.शनिवारी पहाटे देवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी व श्री.स्वप्नील कोळी यांनी देवीचा अभिषेक करून पूजा केली.नंतर देवीची खणानारळाने ओटी भरून आरती केली.
त्यानंतर देवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी हे घोड्यावर बसून पालखी व मानाचे झग घेऊन नगरप्रदक्षिणेसाठी निघाले.जत नगरितून देवीची पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्याकडे निघाली असताना ठिकठिकाणी सुवासिनी महिला पालखी थांबवून पालखीपुढे घागरीने पाणी ओतत होत्या व पुजा-याचे पंचारतीने औक्षण केले.ही देवीची पालखी व मानाचे झग घेऊन पुजारी राजवाड्यावर पोहचताच श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.यावेळी श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे,यांनी श्री.यल्लमादेवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी ,पालखीचे मानकरी श्री.बाळासाहेब कोळी,झगाचे मानकरी काराजंगी येथील ललीता कांबळे आदींचे आहेर माहेर देऊन सन्मान केला.
यावेळी श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीने श्रीमंत उर्वशीराजे डफळे व श्रीमंत अमृताराजे डफळे यांनी श्री.यल्लमादेवीची खणानारळाने ओटी भरली.श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी भगवान परशुरामाची पुजा केली.यानंतर देवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी यांनी देवीची आरती केली.
त्यानंतर देवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी हे नगरप्रदक्षिणेसाठी घोड्यावर बसून सोबत देवीची पालखी व मानाचे झग घेऊन नगरप्रदक्षिणेसाठी डफळे यांच्या राजवाड्यातून बाहेर पडले.
जत नगरितील मानकरी जतचे पोलीस पाटील श्री.मदन माने-पाटील, श्री.खानविलकर, श्री.अजिंक्य सावंत व श्री.कोठावळे यांच्या घरी देवीचे आहेर माहेर करित पुढे नगरातील पालखी मार्गावरून मंदिर परिसरात आली.पालखी ठिकठिकाणी थांबवून पुजा-याचे औक्षण करताना सुवासिनी दिसत होत्या.
देवीची पालखी मंदिर परिसरात आल्यानंतर देवीचे पुजारी हे घोड्यावरुन खाली उतरले व स्नान करण्यासाठी गेले.त्यानंतर देवीची पालखी व मानाचे झग मंदिर प्रदक्षिणा करण्यास निघाले यावेळी ठिकठिकाणाहून देवीचे मुखवटे घेऊन आलेले झग घेऊन हजारो यल्लमाभक्त ,जोगतीनी मंदिर पालखी प्रदक्षीणेत सहभागी झाले होते.
हजारो झगवाले देवीच्या पालखी सोबत मंदिर प्रदक्षीणा करीत असताना उदं गं आई उदं,यल्लू आईचा उद चा जयघोष करित होते.तर भावीक भक्त पालखीवर खारीक,खोबरे व भंडाऱ्याची उधळण करित होते.
देवीच्या पालखीच्या पाच मंदिर प्रदक्षीणा पार पडल्यानंतर देवीची पालखी ही किचाचे ठिकाणी नेण्यात आली. त्यानंतर देवीचे पुजारी श्री.सूभाष कोळी हे किचाभोवती (अग्नीकुंड) सभोवती प्रदक्षीणा घालू लागले त्यांच्या सोबत कोळी समाजाच्या सुवासिनी महिला डोक्यावर अंबीलाच्या घागरी घेऊन पालखीसोबत किचाच्या ठिकाणी पेटवलेल्या धगधगत्या अग्नीकुंडासभोवती प्रदक्षिणा घालत होत्या.
यावेळी देवीचे पुजारी श्री.सुभाष कोळी यांनी धगधगत्या अग्नीकुंडात उडी घेतली व बाहेर पडले.याप्रसंगी उपस्थित हजारो जोगतीनीनी व देवदासीनी मोठा आक्रोश करित आपल्या हातातील बांगड्या दगडावर आपटून फोडल्या.
जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल साळुंखे यांनी यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगला पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी पुढील वर्षांत भरविण्यात येणा-या यात्रेची घोषणा केली व पत्रक वाटप केले.श्री यल्लमादेवीची पुढील यात्रा ही दि.१५ डिसेंबर २०२५ ते १९ डिसेंबर२०२५ या कालावधित भरणार असल्याचे सांगीतले. मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी देवीचा गंधोटगीचा दिवस, बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी देवीचा महानैवैद्य चा दिवस ,गुरूवार दि.१८ डिसेंबर २०२४ रोजी देवीचा किचाचा दिवस व दि.१९ डिसेंबर रोजी अमावशा आहे.
जत येथील यल्लमा देवी यात्रेत पालखी व मानाचे झग घेऊन नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.देवीच्या पुजारी यांनी किचात प्रवेश करताच यात्रेची सांगता झाली.