सोन्याळमध्ये चिमुकल्यानी भरविला प्लास्टिकमुक्त आठवडी बाजार

0
68

सोन्याळ : चिमुकल्यांनी भरवलेल्या प्लास्टिकमुक्त आठवडी बाजाराचे उदघाट्न हभप तुकाराम बाबा महाराज यांच्याहस्ते आणि सरपंच बसवराज तेली,भाजपचे युवानेते आणि माजी सरपंच पती जक्कु निवर्गी, उपसरपंच संगप्पा मुचंडी, माजी उपसरपंच  चिदानंद तेली, माजी सरपंच कलप्पा शिंगे, लखन होनमोरे सर,यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

बालवयातच व्यवहारिक ज्ञान मिळावे, फळभाज्या,रानभाज्या आणि पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी सोन्याळ शाळेच्या मैदानात आठवडा बाजार भरविला होता.

यावेळी हभप तुकाराम बाबा म्हणाले, शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला बाल बाजार हा उपक्रम कौतुकास्पद आहे.विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नाहीतर व्यवहारात सुद्धा

हुशार असणे गरजेचे आहे.त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.  या उपक्रमांमुळे नैसर्ग आणि पर्यावरण जोपासण्यासाठी प्लास्टिकमुक्त बाजाराचे खूप महत्व आहे. तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी या भागात आल्यानंतर हा भाग समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.  जत तालुक्याचे सुजलाम सुफलाम होण्यास म्हैसाळ योजना हातभार लावेल.

म्हैसाळ योजनेचे पाणी संपूर्ण जत शिवारात आल्यानंतर तालुक्याचे नंदनवन होणार असून फळ पिकांची वाढ़ होईल. द्राक्ष डाळिंब शेती बहरून येईल.या प्रत्येक बाल मुलांच्या हातामध्ये  बेदाणा मनुके आणि अन्य महागडी फळ पिके पाहायला मिळेल.सर्वांचा सर्वांगीण विकास येईल. पाचवीला पूजलेला दुष्काळ हटेल.जत तालुक्यात पाणी येणे म्हणजेच आमच्या वाट्याला सोन्याचे दिवस येईल.असे सांगून हभप तुकाराम बाबा यांनी यावेळी प्रत्येकाच्या वाट्याला सोन्याचे दिवस येण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.

यावेळी सरपंच बसवराज तेली म्हणाले,  सोन्याळ गावातील जिल्हा परिषद शाळेने राबविलेला प्लास्टिकमुक्त बाल बाजार उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत अशा प्रकारे उपक्रम राबविल्यास यात विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाची व आर्थिक उलाढालीची आपोआप ओळख होण्यास मदत होईल यात मात्र शंका नाही.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here