फलटण तालुक्यातील वीडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.उसाच्या शेतात या महिलेचे डोक धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाजवळ लिंबू, मिरची आणि हळदी कुंकु आढळून आल्याने हा प्रकार अंधश्रध्देतून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासाला सुरूवात केली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या विडणी गावामध्ये पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला आहे. शेतात कपड्यावर साडी, हळदी, कुंकू, काळी बाहुली, महिलेचे केस, सुरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगळे केलेला मृतदेह देखील आढळून आल्यामुळे परिसरात अघोरी कृत्य करून महिलेची हत्या असल्याची चर्चा आहे. कंबरे खालचा भाग त्यांच्या शेतात आढळून आला आहे.
प्रदीप जाधव हे त्यांच्या उसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळवले.
तंत्रमंत्राचा धाक दाखवून आरे कॉलनीत महिलेसह तिच्या दोन मुलींवर अत्याचार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर साताऱ्यातही अंधश्रद्धेतून महिलेला संपवण्यात आलं आहे. आरे कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी तंत्रमंत्राच्या साहाय्याने पतीचा आजार बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने 37 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेच्या 14 व 16 वर्षांच्या मुलींचाही विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता.
भोंदूबाबाच्या अत्याचाराला विरोध केल्यास कुटुंबियांना जादुटोनाच्या मदतीने जिवे मारण्याची धमकी भोंदूबाबने महिलेला दिली होती.याप्रकरणी आरे पोलिसांनी जादुटोणा विरोधी कायदा व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात भोंदूबाबा राजाराम यादव (वय 43) याला पोलिसांनी अटक केली होती.