खानापूर : मौजे बामणी (पारे), ता. खानापूर, जि.सांगली येथील उदगिरी शुगर अँन्ड पॉवर लि. या कारखान्याच्या गळीत हंगामा 2024-25 मध्ये आलेल्या ऊसास प्रती में.टन एकरकमी 3100/- रु दराने ऊस बील जमा केलेचे चेअरमन डॉ.राहुलदादा कदम यांनी सांगितले.
यावेळी डॉ.शिवाजीराव कदमसर यांनी मागील वर्षीच्या सिझन पर्यंत कारखान्याने उत्तम गाळप केलेले आहे.तसेच गाळपास आलेल्या ऊसाचे एकरकमी सर्व पेमेंट वेळेचे वेळी केलेले असून तोडणी वाहतूक यंत्रणेचेही वेळचे वेळी पेमेंट केलेले आहे.यापुढेही तशीच परंपरा निश्चितच राहील असे आवर्जून नमूद केले.कारखान्यास कायमच शेतकरी, तोडणी वाहतूक यंत्रणा व सर्व अधिकारी,कर्मचारी या सर्व घटकाचे पूर्ण सहकार्य लाभलेले आहे.
यामुळे कारखान्याला तांत्रिक,आर्थिक व्यवस्थापन, पर्यावरण याबाबत विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.सध्या कारखान्याची गाळप क्षमता 5 हजार में.टन, 14 मेगावॅट को-जन व दीड लाख लिटर्स क्षमतेची डिस्टीलरी कार्यान्वित आहे.कारखान्याकडून सामाजिक बांधिलकी या नात्याने सी.एस.आर.फंडातून विविध सामाजिक उपक्रमास व गरजू बाबींना मदत केलेली आहे.
कारखान्याकडे आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणा असून त्याचे नियोजनही अत्यंत चांगले असून शेतकऱ्यामध्ये समाधानकारक वातावरण आहे.या कारखान्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे तसेच आर्थिक उलाढाल वाढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे.
कारखान्याने गळीत हंगाम 2024-25 मधील दिनांक 15 डिसेंबर 2024 पर्यंत 1,61,658 में.टन गाळप केलेल्या ऊसाचे 50 कोटी 11 लाख रुपये ऊस बील शेतकऱ्याच्या बँक खातेवरती जमा केलेले आहे,असे कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुलदादा कदम यांनी सांगितले. यावर्षी कारखान्याने सात लाख गाळपाचे उदिष्ट ठेवलेले असून शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस उदगिरी कारखान्यास गळीतासाठी पाठवावे असे आवाहनही मा. डॉ.शिवाजीराव कदमसर व चेअरमन मा. डॉ.राहुलदादा कदम यांनी केले.