जत : अध्यात्म ही हिंदू राष्ट्राची शक्ती, प्रेरणा आहे. अध्यात्मातुन मानसिक समाधान लाभते.जो मानसिक समाधानी असतो तो सुखी असतो. जिवनात अध्यात्माला अन्यसाधारण महत्व असून अध्यात्म काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
सांगली येथील नेमीनाथ नगर येथे अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्रीराम कथा व नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन १७ ते २७ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.तत्पूर्वी हभप तुकाराम बाबा महाराज यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिल्यानंतर आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी हभप तुकाराम बाबा महाराज यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी हभप दत्तात्रय अंबे, हभप महादेव इसापुरे, हभप दिलीप सुर्यवंशी-पाटील, शिवाजी कोळपे, मा लक्ष्मण नवलाई माजी नगरशवक आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष सारडा यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती यावेळी दिली. सर्वांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आव्हान कार्यक्रमाचे संयोजकांनी केले.
सत्काराला उत्तर देताना हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये केसांएवढा फरक आहे. अंधश्रद्धेच्या नादी न लागता श्रद्धेने अध्यात्म केल्यास त्याचा निश्चित फ़ायदा होतो हा इतिहास आहे. संगलीमध्ये आयोजित केलेला हा भव्यदिव्य अध्यात्म सोहळा मनाला आनंद देणारा व आपली संस्कृती जतन करणारा आहे. सांगली प्रमाणेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अध्यात्म सोहळे झाले पाहिजेत. येणाऱ्या पिढीला दिशा देण्यासाठी अध्यात्म हाच सक्षम पर्याय आहे.