जतमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार; एक गंभीर

0
348

जत : तालुक्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले तर एक तरुण गंभीर जखमी झाला. शहाजान काशिम नदाफ (वय ४६, रा. जत) व शिवाजी किसन कोळी (वय ३०, रा. कुंभारी, ता. जत) अशी मृतांची नावे आहेत. विजय संभाजी क्षीरसागर (वय २८) हा गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडविल्याने शहाजान काशिम नदाफ हे जागीच ठार झाले.

अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला. शहाजान नदाफ हे सांगली रोडवर शहरापासून जवळच्याच अल्ताफ ढाब्यासमोर राहतात. गुरुवारी रात्री शहरातील आपले काम आटोपून ते दुचाकी (एम एच १६ एस ७१०६) वरुन घराकडे निघाले होते. दुचाकी क्रीडा संकुलजवळ आली असता पाठीमागून कवठेमहांकाळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (एमएच १० झेड ०७९६) ने दुचाकीला उडविले. या अपघातात शहजान नदाफ गंभीर जखमी झाले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात कुंभारीजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.

शिवाजी किसन कोळी (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, विजय संभाजी क्षीरसागर (वय २८) असे जखमी तरुणाचे नाव आहे

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here