जत : हेरिटेज फुडस् दुध संकलन केंद्र गुड्डापूर यांच्या वतीने जंत निर्मुलनाचा सामूहिक कार्यक्रम आंसगी ता.जत येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी गुड्डापूरचे प्लांटचे मॅनेजर श्री.शुभम निंबाळकर सुपरवायझर श्री.सुभाष भोसले आणि दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वाना जंतनिर्मुलना साठी गोळ्या देऊन जंतनिर्मुलन करून घेतले.
हिरवा चारा, बुरशि युक्त चारा यातून जंत गाई म्हैस यांच्या शरीरात जात असतात. बाधित जनावरांच्या शेणातून जंत जमिनीवर येत असतात. हे जंत नवीन उगवलेल्या गवताच्या पात्यावर येऊन बसतात. असे कोवळे गवत वासरांनी खाल्ल्यानंतर त्यांना जंताची बाधा होत असते.जंत वासरांच्या आतड्यात वास्तव्य करून राहतात.
आतड्यातील अन्नद्रव्याचे शोषण जंत स्वतःच्या वाढीसाठी करतात. त्यामुळे वासरांना शरीर वाढीसाठी पोषक घटक मिळत नाहीत. यासाठी वासरांचे वेळोवेळी जंतनिर्मुलन करणे गरजेचं आहे. ही सर्व माहिती देऊन जंतनिर्मुलन करून घेतले. यावेळी गावातील दुध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनावरांचे जंतनिर्मुलन लसीकरण का करावे ?
जंत हे परजीवी असल्याने स्वतःच्या पालन-पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. जंत हे जनावरांच्या पोटातील, रक्त, स्त्राव, अन्नपदार्थ यांवर जगत असतात. वेळोवेळी जनावरांना जंताचे औषध न दिल्यास, पोटातील जंताची संख्या वाढत जाते. मोठ्या जनावरांना तीन महिन्याच्या अंतराने आणि वासरांना दर महिन्याला, त्यांचे वय सहा महिने होईपर्यंत जंत निर्मुलन करावे. प्रभावी जंतनिर्मुलनासाठी गोठ्यातील सर्व जनावरांचे जंतनिर्मुलन एकाच वेळी करावे.
– शुभम निंबाळकर,प्लॉट मॅनेजर हेरिटेज फूड्स, शाखा गुड्डापूर.)