जत : जत तालुक्यातील कुडनूर गावच्या हद्दीत डफळापूर अनंतपुर रस्त्याच्या पश्चिम बाजूस हॉटेलच्या बाजूस उत्तरेस मोकळ्या जागेत तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरील ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यात रोख रक्कम ६८८६० रुपये व चार चाकी एर्टिगा कार असा एकूण ७ लाख १८हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एकूण ६ आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कुडनूर गावच्या हद्दीत तीन पानी पत्त्याचा खेळ बेकायदेशीरपणे खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच या खेळात वापरलेले साहित्य व रोख रक्कम असा एकूण ७१८८६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. यामुळे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ कलम १२ (२) या कायद्याअंतर्गत पोलिसांनी एकूण ७ आरोपीवर गुन्हा दाखल केला.
त्यांची नावे पुढील प्रमाणे युवराज श्रीकांत धोडमणी (वय २६) रा. अथणी, जिल्हा बेळगाव,महालिंग कुमार शिवाप्पा व्याळी (वय ३२) रा. अथणी, सुनील मुरग्याप्पा हेगण्णवार (वय ३४) रा. अथणी, चिदानंद अशोक बाशिंगी (वय २३) रा. अथणी केदारी सिद्राया कोरी (वय ३२) रा. अथणी, लोकेश ज्ञानेश्वर शिंदे (वय ३२) रा. अथणी, रामन्त्रा सिद्धाप्पा ब्राह्मणवर (वय २८) रा.थाबा, ता. इंडी यांच्याकडील रोख रक्कम ६८८६० व ६ लाख ५० हजाराची एर्टिगा कार असा एकूण-७१८८६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.
गुगवाडचे जुगार अड्डे कुडणूरकडे सरकले ?
जत तालुक्यात अनेक ठिकाणी असे छुपे जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत.त्यांना कुणाचा आशिर्वाद आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.त्याततल्यात सर्वाधिक चर्चेत असलेले तीन पानी जूगारचे माहेरघर बनलेला गुगवाड फाट्यावरील अड्डे बंद झाल्यानंतर आता हे परराज्यातील जुगार अड्डे चालक जागा शोधत कुडणूरकडे सरकल्याची चर्चा असून वेळीच याला पायबंद न घातल्यास या भागातील अनेक घरे उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत हे निश्चित आहे.