डफळापूर येथील सिद्धी मॉल या मॉलचा दिवाळी निमित्त आयोजित भव्य लकी ड्रॉ योजनेची सोडत 26 जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनादिवशी विविध मान्यवराच्या उपस्थित करण्यात काढण्यात आली.
यात पहिले बक्षीस ‘होंडा एक्टिवा’ दुचाकीच्या विजेत्या बेंळूखीतील ग्राहक संगीता चव्हाण या विजेत्या ठरल्या.दरम्यान गँस शेगडी,एलईडी टिव्ही,कुकर,मिक्सर आदी बक्षिसाचेही विजेते घोषित करण्यात आले.लकी ड्रॉ निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ५ महिलांना सोडत योजनेद्वारे पैठणीचे बक्षिस देण्यात आले.डफळापूर येथील अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सिद्धी मॉल चा दिवाळीनिमित्त कपडे खरेदीवर भव्य लकी कुपन योजना ठेवण्यात आली होती. या योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.दिवाळीनिमित्त कपडे फर्निचर भांडी अन्य साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर आज 26 जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत या योजनेचा लकी ड्रॉ काढण्यात आला. लहान मुलांच्या हस्ते यातील सर्व क्रमांकाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.यात पहिले भाग्यवान टीव्ही होंडा एक्टिवा दुचाकीचे विजेते बेंळूखीतील ग्राहक संगीता चव्हाण या ठरल्या आहेत. त्यांच्यासह अन्य विजेत्यांना मॉलचे मालक प्रसाद गुरव, सागर गुरव यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.