सिद्धार्थ पॉलीटेकनिकच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी 2024 च्या परीक्षेत उत्तुंग यश 

0
48

जत : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा-2024 मध्ये जत येथील सिद्धार्थ पॉलीटेकनिकच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश मिळविले.कॉलेजचा एकूण निकाल 88 टक्के लागला आहे.

यात कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान कु.राठी मानसी 90% (कॉम्प्युटर विभाग) हिने मिळवला आहे.

विभागानुसार निकाल प्रथम वर्ष : प्रथम खोत वेदिका – 80%,द्वितीय शिंदे अजय -79%,तृत्तीय राठोड नेमाजी -78% द्वितीय वर्ष सिव्हिल : प्रथम लोखंडे अरुण -80.71%,द्वितीय मुडदेगोल सचिन-74.12%,तृत्तीय जाधव महेश -73.06% द्वितीय वर्ष कॉम्प्युटर :प्रथम चव्हाण सिद्धी -88.59%,द्वितीय गुरव मानसी -86.94%,तृतीय भुई योगिता -83.29% द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल : प्रथम पारसे सुमित -75.18%,द्वितीय सरगर राहुल -73.29%,तृतीय म्हेत्रे सुश्मिता -72.12%

द्वितीय वर्ष मेकॅनिकल : प्रथम पवार अथर्व -80%,द्वितीय घाटगे आदित्य -76%,तृतीय खांडेकर अद्वित-73% तृतीय वर्ष सिव्हिल : प्रथम जातगार रफिक -76% तृतीय वर्ष कॉम्प्युटर : प्रथम राठी मानसी -90%,द्वितीय ओलेकर अक्षता-84.89% कदम प्रणाली-84.89%,तृतीय कु.पाटील तनुजा-82.89% तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल : प्रथम धूप मानतेश -83.90%,द्वितीय कोळेकर राहुल-79.20%,तृतीय सावंत रखमाजी-76.70%

तृतीय वर्ष मेकॅनिकल : प्रथम तुळजानवर महेश -76%,द्वितीय राठोड करण -75%,तृतीय लवटे शुभम -72% यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर,संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडिकर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे सर्व संस्थेचे संचालक,पदाधिकारी यांनी कौतुक केले.त्यांना प्राचार्या सौ.वागोली रेणुका,विभागप्रमुख श्री.कारकल प्रकाश,श्री.साळुंखे हरीश,श्री.रजपूत करण,कु.पुजारी रुपाली,यांच्यासह नॉन अकेडेमिक इन्चार्ज श्री.बाबर संजय,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here