सांगली : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आटपाडी तालुक्यातील प्राप्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी तहसिल कार्यालय आटपाडी येथे प्रभारी तहसिलदार तथा संजय गांधी योजना आटपाडी अध्यक्ष मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीमध्ये एकूण 72 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी योजनेची 49 व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची 23 प्रकरणे पात्र ठरली. संजय गांधी योजनेतील पात्र प्रकरणांमध्ये विधवा 22, दिव्यांग 19, परितक्ता 5, अविवाहीत स्त्री 1, निराधार पुरूष 1, कर्करोगग्रसत 1, अशी प्रकरणे पात्र ठरली.
फेब्रुवारीमध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांना अर्ज करावेत, असे आवाहन श्री. ऐतवडे यांनी यावेळी केले.