ज्ञानाचा खजिना हा आपल्याला पुस्तक वाचनातूनच मिळत असतो.आजच्या आधुनिक युगात माणसांचा वाचनाचा कल कमी होत चालला आहे.आज आपण जिवनाकडे सकारात्मक पद्धतीने बघितले पाहिजे.वाचनाने माणूस ज्ञानी बनतो.पुस्तक वाचनाच्या रूपाने आपण एक मित्र मिळवतो.
पुस्तकांचे वाचन करून ज्ञानरुपी अमृत प्राशन केले. तर ज्ञान मिळवण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही.वाचनाने ज्ञानार्जन तर होतेच. परंतू व्यक्तीमत्चाचा विकास होतो.वाचन ही एक तपस्या आहे.त्यातूनच आपण ज्ञानार्जन करतो.
कथा , कादंबरी,नाटक, आत्मचरित्र,यातूनच माणूस ज्ञानसंपन्न होतो.वाचाल तर वाचाल हे खरे आहे.दोस्ती करावी पुस्तकांशी तेव्हाच आपले जीवन होईल मस्त आज पुस्तकांसारखा दुसरा प्रामाणिक मित्र नाही.आज माणसांकडे वेळ कमी असला तरी आवर्जून पुस्तके वाचनासाठी वेळ काढायला हवा.
पुस्तक वाचनाने जिवनाचा सर्वांगिण विकास होत असतो.आजच्या युवा पिढीने पुस्तकं वाचलीच पाहिजे.माणसाची जडणघडण होण्यासाठी पुस्तकांची भुमिका अत्यंत मोलाची आहे.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तके वाचलेच पाहिजे .
आज इंटरनेटवर सर्व माहीती उपलब्ध होत असली तरी पुस्तक वाचनाची सवय निर्माण करणे गरजेचे आहे.तणावाच्या परीस्थितीत माणसांचे रागाचे प्रमाण खुप वाढते.त्यासाठी ग्रंथच माणसाला शांत राहण्यास मदत करतात.वाचनारा माणूस जिवनात हारत नाही.जिवनात पुस्तके वाचायला शिकले पाहिजे.त्यासाठी पुस्तकांशी दोस्ती केली पाहिजे.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा,
जिल्हा, अहिल्यानगर
मो.७७२१०४५८४५